जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सतर्फे तहसिल कचेरी शेजारी वर्षोल्हास २०२५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थीनींनी तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहे. ९ व १० जाने रोजी दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सूरू राहणार आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख अतिथी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील व गोदावरी आयएमआर कॉलेजचे डायरेक्टर डॉ प्रशांत वारके महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ कविता देशमुख यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. कौशल्य शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे प्रदर्शन खर्या अर्थाने सक्षम बनवते आणि या दिशेने डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेजने उचललेले प्रत्येक पाऊल कौतुकास्पद आणि इतरांसाठी एक उदाहरण आहे. या प्रदर्शनात व विद्यार्थिनींनी तयार केलेल्या मिठाई आणि विविध स्वादिष्ट पदार्थांसोबतच दिवे, दागिने, भेटवस्तू, सूट, साड्या, ज्यूट बॅग, टॉवेल सेट, कुर्ती, टेबल रनर्स, जेल मेणबत्त्या, हर्बल साबण फॅशन ज्वेलरी एम्ब्रोईडरी बॅग बांधणी ड्रेस मटेरिअल मॅक्रमे वस्तू वन पीस घागरे रेडी टु वेअर साडी आणि घर सजावटीच्या विविध वस्तू रुखवत सामान विक्रीवर ठेवण्यात आल्या आहेत याला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला.
प्रदर्शन आणि विविध स्टॉल्सवरून भरपूर खरेदीही केली. मोठ्या संख्येने विविध महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रदर्शन यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल प्राचार्य सौ कविता देशमुख यांनी संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन केले. डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेजच्या नवोदित उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण निर्मितीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेज वेळोवेळी अशा प्रकारच्या प्रयत्नांचे आयोजन करत असते आणि हे प्रदर्शन देखील या मिशनच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी मिनल राणे कविता भोरटके जयश्री कुलकर्णी आणि समृध्दी सराफ यांनी परिश्रम घेतले.