जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात नुकतेच गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सत्कार कार्यक्रम पार पडला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ८ वर्षांपासून दिला जात असून, यंदा हा ९वा वर्ष आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना चषक, प्रमाणपत्र आणि ५००० रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला जातो.

या पारंपरिक कार्यक्रमाची सुरूवात डॉ. एन एस आर्विकर व स्व. डॉ. कडूस्कर यांच्या संकल्पनेतून झाली होती आणि आजही ती अखंडपणे सुरू आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सी.डी. सारंग, मेडीसिन विभागप्रमुख डॉ. सी.डी. सारंग, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांची उपस्थिती होती.

सत्कारात विविध महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश होता. डॉ. कडूस्कर यांचा “ओम अवार्ड” तृतीय वर्ष एमबीबीएस भाग २ मध्ये यश तिवारी आणि मुलींमध्ये मोईयादी उम्मे आईमन यांना प्रदान करण्यात आला. डॉ. एन एस आर्विकर यांचा “एक्सलन्स अवार्ड” तृतीय वर्ष एमबीबीएस भाग १ मध्ये राहूल जैन आणि मुलींमध्ये बोदियाजी आदिबा यांना दिला गेला. याव्यतिरिक्त, “स्व. वासुदेव पाटील अवार्ड” व्दितीय क्रमांक विजेते शार्दुल कावनकर आणि रिया साळवी यांना तसेच “डॉ. नागेंद्र अवार्ड” मायक्रोबॉयोलॅजी टॉपर साठी सायली कापसे यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपावर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, अशा पुरस्कारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होते आणि ते आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी पुढे जातात, असे सांगितले.



