डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये पुणे एम. के. सी. एल. व ओम इन्फोकॉम एज्युकेशन व टीम यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली.

या अभियानात सायबर क्राईमच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक महिला शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनी नि यांना ऑनलाईन कसे फसवले जाते ब्लॅकमेल कसे केले जाते. यासह विविध ऑनलाईन फ्रॉड केले जातात यावर संपूर्ण माहिती देण्यात आली.

यावेळीस मुख्यध्यापिका भरती महाजन व सर्व शिक्षक वृंद तर एम. के. सी. एल. चे अधिकारी उमाकांत बडगुजर आणि ओम इन्फॉकोम एज्युकेशचे संचालक सागर परदेशी उपस्थित होते. यावेळी उमाकांत बडगुजर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सागर परदेशीं सर यांनी सर्व जेष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही फ्रॉडला बळी न पडता अवेअर राहण्यास सांगितले

Protected Content