जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वर्षभर शेतात राबराब राबणार्या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण. डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील बैलपोळ्यानिमित्त श्रीमती गोदावरी पाटील व डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते सर्जाराजाचे पूजन करुन गोड नैवैद्य देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी बळीराजाचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. जमिनीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण २६ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात आज शुक्रवार, दि.२६ ऑगस्ट रोजी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, किवा पाटील यांची विशेष उपस्थीती होती. मान्यवरांच्याहस्ते सर्जाराजाचे विधीवत पूजन करण्यात आले तसेच त्याला गोडाचा नैवेद्य दाखवून धान्याची रासही खाण्यास ठेवण्यात आली. सर्जाराजाला नमस्कार करुन त्याबद्दल कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी हृदयविकार तज्ञ डॉ.प्रदिप देवकाते, डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, डॉ.अशोक चौधरी, हॉर्टिकल्चरचे संचालक प्रा.सतिश सावके, प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्किन विभागातील रेसिडेंट डॉक्टर्स यांनीही बैलजोडींचे पूजन केले.
तसेच डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते शेतकर्यांना शाल, श्रीफळ, टोपी घालून सन्मानित केले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि डॉ.उल्हास पाटील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.