डॉ. सुमित नावरकर यांना सरकारकडून अधिकृत वैद्यकीय नोंदणी प्राप्त

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. सुमित नावरकर. त्यांनी सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत एन.ई.एस. हायस्कूल येथे १२वी सायन्स पूर्ण केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी युरोपमधील जॉर्जिया येथे जाऊन एम.बी.बी.एस. पदवी संपादन केली.

भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय आयुर्विज्ञान बोर्ड परीक्षा त्यांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरच्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली. या यशस्वी प्रवासानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई यांच्याकडून त्यांना अधिकृत वैद्यकीय नोंदणी प्राप्त झाली, ज्यामुळे आता ते भारतात अधिकृत डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा देऊ शकतात.

या उल्लेखनीय यशाबद्दल एन.ई.एस. हायस्कूलचे अध्यक्ष माजी खासदार वसंतराव मोरे, चेअरमन मिलिंद मिसर, उपाध्यक्ष केशव क्षत्रिय, अशोक वाणी, डॉ. रविंद्र नावरकर, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, ल.शा. वाणी समाज उपाध्यक्ष हेमकांत मुसळे, सचिव महेंद्र कोतकर, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष विलास वाणी, सुनील शहा, डॉ. प्रशांत शिनकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. सुमित नावरकर यांच्या पुढील यशस्वी वैद्यकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Protected Content