डॉ. उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुलमध्ये विज्ञात प्रदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, ज्याचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध स्वयंनिर्मित मॉडेल्स सादर केले, ज्यात ड्रॉइंग, क्राफ्ट, इंग्लिश, हिंदी, सोशल सायन्स, संगणक, विज्ञान, गणित, पर्यावरण संरक्षण, सौर यंत्रणा, पाणी बचत, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण यांसारख्या विषयांचा समावेश होता. प्रत्येक मॉडेल विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृषटिकोनाचे उदाहरण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्या मॉडेल्सचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की, पुस्तकी ज्ञानाबरोबरच शालेय जीवनातील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. विज्ञान आणि कलेची आवड निर्माण करण्यासाठी शाळेने अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन विकसित होईल. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल भारती महाजन, शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारीवृंद देखील उपस्थित होते.

Protected Content