जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला खूप महत्त्व आहे. मुली व महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे वैद्यकिय शिक्षण घेणा या मुलींसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात संक्रात सणानिमीत्त कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
शिक्षणासोबतच देशाच्या संस्कृतीचे ज्ञान विदयार्थ्यांना मिळाले पाहीजे व सणानिमीत्त घरगृती वातावरणात असल्याची जाणीव करून देण्याच्या उददेशाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात वसतिगृहात राहण्या या विदयार्थीनींनसाठी संक्रांत सण या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे त्यांना आनंद प्रत्यक्षात अनुभवता आला.
यावेळी प्रथम वर्ष एमबीबीएसची वनमाला वाघ आणि व्दीतीय वर्षाची प्रगती चौधरी यांनी आर्कर्षक रांगोळी व सजावट केली होती. विदयार्थीनींनी वर्षभर काळजी घेणा या रेक्टर व आयांना तिळगुळ वाटप करीत आर्शिवाद घेतला व आनंद लुटला. महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमासाठी प्रमुख ज्योत्सना व अर्चना भिरूड यांनी मार्गदर्शन केले. या निमीत्ताने सुरक्षितेची जबाबदारी आमची आहे व आम्ही तुमची रक्षा करू असे सांगत मुलींच्या आनंदात सहभागी झालेले दिसून आले.