जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासोबतच पारोळ्याचे विद्यमान आमदार डॉ. सतिश पाटील यांनी आज आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल केला. काही तांत्रिक कारणाने अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास पक्षातर्फे उमेदवार कायम राहावा म्हणून त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
आज जळगाव लोकसभा मंतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एरंडोल व पारोळ्याचे आमदार सतिश पाटील यांनी डमी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते. मध्यंतरी भाजप म्हणताय की दोन जागांपैकी एक जागा बिनविरोध होत असल्याचे सांगत आहे. असे होऊ नये यासाठी मला कुठल्याही गोष्टीचे आकर्षण नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. मुले पळविण्याचे कामात सतिशअण्णा फसणार नाही. आमचे सक्षम उमेदवार गुलाबराव देवकर आहेत. पण तरीही मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची शहरातील लेवा भवनात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश पाटील, काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, रविंद्रभैय्या पाटील यांची उपस्थिती होती.