Home Cities जळगाव डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे उद्या निषेध मोर्चा

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे उद्या निषेध मोर्चा


dr.payal tadavi
 

जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने  रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या दि 30 रोजी दुपारी 4 वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून नायर रुग्णालयातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ पायल तडवी या मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत होत्या. वरिष्ठ महिला डॉक्टरांनी हिणवीत उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी असा प्रकार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याची अतिशय वाईट घटना घडली आहे. या घटनेचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व जळगांव महानगर काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound