पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या टिकिटावर निवडणुक लढऊन मतदार संघ निरोगी, सुजलाम सुपलाम आणि गुंडगीरी, दडपशाही मुक्त करणार असल्याची माहीती उत्तर महाराष्ट्र वैद्यकिय आघाडी उपाध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. याप्रसंगी डॉ. विजय पाटील, डॉ. सतिष पाटील आणि विकास लोहार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. निळकंठ पाटील म्हणाले की, मी शेतकरी पुञ आहे. गेल्या १२ वर्षापासुन वृंदावन हॉस्पिटलच्या माध्यमातून मतदार संघात वैद्यकिय सेवा देत आहे. तळागाळातील सामान्य जनतेशी माझा संपर्क येतो. शेतकर्यांशी नाळ असल्या सोबतच ग्रामीण भागातील समस्यांची मला जाण आहे. मी भडगाव तालुक्यातील वाक ग्रामपंचायत निवडणूक लढून राजकारणात प्रवेश केला आणी वाक गावातील नागरीकांना आदर्श वाटावा असा कारभार करीत आहोत. मी गेल्या वर्षभरापासून मतदार संघात विविध वैद्यकिय शिबिरे आणि मेळावे घेवून जनमासनाचा कौल जाणुन घेतला. जनतेला परिवर्तन हवे आहे. मतदार संघाचे वातावरण गढूळ झाले असून गुंडगीरी आणी दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. मतदार संघ सुदृष्ठ, सुजलाम, सुपलाम करण्याचा आणि रामराज्य आणण्याचा माझा मानस आहे. मतदार संघात वैद्यकिय सुविधांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. मतदार संघातील लहान मोठ्या १९ नद्यांवर ठिकठिकाणी बांध बांधून पाणी अडवत मतदार संघात शेतकरी सक्षम करणे आहे. मला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी व नेत्यांनी विधानसभेच्या निवडणूकीची तयारी करण्याचे आदेश दिले असुन पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपाच्या कमळ चिन्हावर मी निवडणुक लढणार आणी जिंकणार असल्याचा आत्मविश्वास डॉ. निळकंठ पाटील यांनी व्यक्त करत करीत मी कुणाच्या सांगण्यावरुन निवडणुक लढवीत नाही. ही फक्त अफवा असुन पक्ष हा माझ्यासाठी सर्वकाही असल्याचे त्यांनी सांगीतले.