ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नर्मदा परिक्रमाकार डॉ. नि. तु. पाटलांचा हृद्य सत्कार

 

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकतेच नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांचा वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला.

शहरातील रिंग रोड जवळील योग केंद्रात वासुदेव जेष्ट नागरिक संघा तर्फे डॉ.नितु पाटील यांचा सत्कार आणि माँ नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम परिसरातील जेष्ठ नागरिक यांनी आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.व.पु.होले,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील,सचिव प्रभाकर झांबरे,युवा नेते विशाल जंगले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. यानंतर श्रीमती ज्योती चौधरी यांनी माँ नर्मदा अष्टक म्हटले. पुरुषोत्तम मास सुरू असल्याने भगवतगीतेचा 15 वा अध्याय प्रकाश पाटील यांनी म्हटला.वेळी डॉ.नितु पाटील यांचे आईवडील तुकाराम पाटील,सौ.वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला सोबत डॉ.पाटील दाम्पत्य यांचा देखील शाल,श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

पुढे डॉ. नितु पाटील यांनी नर्मदा मातेचीच परिक्रमा का केली जाते याचे अध्यात्मिक महत्त्व सांगितले. तसेच परिक्रमा करत असतांना डॉ.नितु पाटील यांना आंबे खाण्याची इच्छा त्यांनी ती मातेला सांगितली तर चमत्कार म्हणजे पुढील ६ दिवस सकाळ संध्याकाळ डॉ.नितु पाटील यांना आंबेच खायला मिळाले. माँ नर्मदा परिक्रमा करत असतांना आपण जी काही इच्छा मातेकडे करतो ती इच्छा माता नक्कीच पूर्ण होते असा प्रत्येक परिक्रमावासी यांचा अनुभव आहे. माँ नर्मदा परिक्रमा १०८ दिवसांतच का पूर्ण झाली,याबाबत डॉ. पाटील यांनी अध्यात्मिक महत्त्व सांगितले तसेच विविध अनुभव कथन केले.शेवटी माँ नर्मदा मातेच्या प्रेरणेने तयार केलेलं भक्तीगीत गायले.

डॉ. पाटील यांची परिक्रमा समाजाला दिशा देणारी.. प्रा.व.पु होले
आपल्या उभारीच्या काळात संसार सोडून 108 दिवसात 3600 किलोमीटर अंतर चालत चालत माँ नर्मदा परिक्रमा पूर्ण तर केलीच सोबत सामाजिक भान जोपासत त्यांनी जे स्वच्छता गृह साफ करण्याचे कार्य केले आहे,ते नक्कीच आगामी पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे.
यावेळी अध्यात्म आणि विज्ञान यांची कशी सांगड असते याचे विविध उदाहरण देत प्रा. व. पु. होले यांनी जेष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला.
वासुदेव जेष्ठ नागरिक संघात नवीन सभासद झालेल्या सर्व नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला.

यावेळी प्प्रास्ताविक धनराज पाटील,मनोगत श्रीमती ललिता टोके,प्रभाकर झांबरे,लोटू फिरके तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पाटील,आणि आभार प्रदर्शन भारती बेंडाळे यांनी केले.

Protected Content