भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण आरोग्यरत्न वनश्री पुरस्कार येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हेमंत पाटील यांना नुकताच मिळाला. जळगाव येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज 25 रोजी दुपारी 12:30 वाजता झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमास निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेम कुमार अहिरे, राज्य अध्यक्ष डी. आर. पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील यांच्यासह मा.आ. राजूमामा भोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. निसर्ग मित्र समिती, धुळे तर्फे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारतेप्रसंगी डॉ. हेमंत पाटील यांच्यासोबत पत्नी तथा स्त्रीरोगतज्ञ प्रणिता पाटील उपस्थित होत्या.