जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी बी एस इ स्कूल सावदा येथे डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्यां भारती महाजन, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थीत होते. प्राचार्या सौ भारती महाजन व शिक्षिका उषा तायडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले विद्यार्थ्यांना आदर्श ठेवून जातो किंवा ऐतिहासिक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यामागचे उद्देश एकच आहे की त्या विद्यार्थ्यांनी असा आदर्श घेऊन आपला पुढील वारसा हा जपला पाहिजे असे भारती महाजन यांनी सांगितले. शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले