डॉ. कुंदन फेगडे पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने सन्मानित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दैनिक लोकमतच्या वतीने सोहळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांना लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खान्देश हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जळगाव शहरातील कोल्हे हिल्सवर झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, धुळे जिल्ह्यातील आमदार अमरीश पटेल, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, मॅनेजिंग डायरेक्टर गौरव रस्तोगी उपस्थित होते. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील २४ मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल डॉ कुंदन फेगडे यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content