यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला राज्यानुसार साजरा होणारा बैलांचा सण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे .
काळया मातीशी ईमान राखणाऱ्या बळीराजा शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणुन मराठी सांस्कृती व परम्परे अनुसार बैलांना पुरणपोळीचा नैवद्य भरवला जातो,बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांशी संबंधीत हे सण आहे. पिठोरी अमावस्येला हा सण संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी माणुस बैलांचा हा सर्जा – राजा सण साजरा करीत असतो या निमित्ताने बैलांची सवाद्य मिरवणुक काढण्यात येत असते, ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलांची पुजा करतात यावल येथील शेतकरी कुटूंबात जन्मलेले भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस व समाजहिताचे विधायक कार्यात अग्रेसर असलेल्या आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन सुधाकर फेगडे यांनी आपल्या जन्म गाव सातोद येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात आपल्या कुटुंबासमवेत पारंपारिक पद्धती बैलपोळा साजरा केला .