यावल प्रतिनिधी । येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामस्थांसाठी टँकरव्दारे मोफत जलसेवा सुरू केली आहे.
तालुक्यातील हिंगोणा येथे तीव्र पाणी टंचाई असल्याने या गावात टँकरव्दारे पाणी पुरवठा करून तेथील नागरीकांना दिलासा मिळावा या उद्देशाने यावल येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एका टँकरव्दारे हिंगोणा गावात मोफत पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटल समोर डॉ. फेगडेंनी त्यांच्या आई सौ. कलावती फेगडे यांच्या हस्ते यांच्याहस्ते या टँकरचे लाकार्पण करण्यात आले. या प्रसंगी त्यांचे वडील सुधाकर रामदास फेगडे,भास्कर रामदास फेगडे, हुना रामदास फेगडे, हेमंत देविदास पाटील, प्रशांत अशोक फेगडे, निलेश भास्कर फेगडे, मुरलीधर दगडू पाटील, डॉ. जागृती फेगडे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ पराग पाटील, रितेश बारी, संजय फेगडे, व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, उज्वल कानडे, विजय महाजन, किशोर महाजन, मनोज बारी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
सध्या हिंगोेणा येथील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता या गावात मोफत जलसेवा आपण प्रारंभी या गावातील नागरीकांना मोफत जलसेवा पुरवणार असुन नंतर शहरासह तालुक्यातील नागरीकांना याच प्रकारची नि:शुल्क सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कुंदन फेगडे यांनी याप्रसंगी दिली.