धरणगाव (प्रतिनिधी) काळाची गरज ओळखून जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक पर्यावरण घटकांचे संवर्धनासाठी तरुणांनी लोक प्रबोधन चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. किशोर पाटील यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले.
येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगावच्या एनसीसी, एनएसएस विद्यार्थी कल्याण आणि पर्यावरण विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. एन.सी.सी विभाग प्रमुख मेजर डॉ. अरुण वळवी यांनी सर्व विद्यार्थी.कर्मचारी शिक्षकांना वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आवाहन केले. डॉ. छाया सुखदाणे, प्रा.वा ना आंधळे, डॉ.प्रवीण बोरसे, संदीप पालखे, प्रा.राजू केंद्रे, डॉ.बी.एफ.शेख, डॉ.विजेयद्र वारडे, जिमखाना प्रमुख प्रा.दीपक पाटील, डॉ.ए.ए.जोशी, डॉ.श्रीपाद उपासनी यांच्यासह एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संजय शिंगाणे, ग्रंथपाल पंकज देशमुख, नारायण चव्हाण, किरण सुतारे, दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपक बोंडे यांनी आभार व्यक्त करीत वृक्षसंवर्धनासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.