Home Cities भुसावळ जोगलखेडे येथे डॉ.जगदीश पाटील यांचा सत्कार

जोगलखेडे येथे डॉ.जगदीश पाटील यांचा सत्कार


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील डॉ. जगदीश पाटील सर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल डॉ.जगदीश पाटील यांचा सत्कार जोगलखेडे- भानखेडे ग्रुप ग्रामपंचायत तर्फे आयोजित करण्यात आला होता,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पंकज डिगंबर पाटील हे होते. योगायोग  सरांचा वाढदिवस सुद्धा असल्याने वाढदिवसाच्या निमित्ताने केकही कापण्यात आला.

यावेळी डॉ.जगदीश पाटील यांचा सत्कार माजी सरपंच पंकज डिगंबर पाटील व उपसरपंच जानकिराम कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य गजेंद्र पाटील, समाजसेवक नामदेव पाटील, ग्रामसेविका प्रतिभा तायडे, वि.का.सोसायटी चेअरमन राजेंद्र पाटील, पोलिस पाटील भूषण पाटील, जितेंद्र झांबरे (मुख्याध्यापक- जोगलखेडे), गणेश फेगडे (मुख्याध्यापक- भानखेडे), शिक्षक सुधीर तायडे, सौ.सोनाली तायडे, अंगणवाडी सेविका निर्मला पाटील, आशासेविका प्रतिभा जंजाळे, शिपाई ठकसेन कोळी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound