जळगाव प्रतिनिधी । १९ मे हा दिवस संपूर्ण जगात (inflammatory bowel diseases) आयडीबी ‘डे’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधत अल्सरेटीव्हा कोलायटीस आणि क्रॉन्स डिसीस या आजारांच्या जनजागृतीसाठी शोभा हॉस्पिटल अँन्ड सुपर स्पेशालिटी गॅरट्रोएन्ट्रोलॉजी सेंटरच्या वतीने आज हॉटेल रॉयल पॅलेस येथे रुग्णांसाठी कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाभरात आलेल्या रूग्णांची उपस्थिती होती.
अल्सरेटीव्ह कोलायटीस हा मोठ्या आतड्याचा आजार आहे. क्रॉन्स डिसीस लहान व मोठ्या आतडयाच्या आजार आहे. पूर्वी पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात आढळणारे हे आजार आता भारतात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत, बदलती जीवन शैली, बदलत्या खाण्या पिण्याच्या सवयी, पाश्चिमात्य देशातील पदार्थांचा आहारातील समावेश व भारतीय आहाराकडे होणारे दुर्लक्ष हे आजाराचे मुख्य कारण मानले जाते. हा आजार सर्वसाधारणपणे लहान वयोगटात आढळून आला आहे. याचे प्रमाण 50 टक्केहून अधिक आहे. त्या खालोखाल प्रौढ गट आणि शेवटी वयोवृध्द असे प्रमाण आहे. वारंवार लुझ मोशन होणे, लुझ मोशन होतांना रक्त पडणे, वारंवार पोट दुखणे, पोटाला सुज येणे, थकवा येणे हे या आजाराचे लक्षण आहे. याला वेळी उपचार केल्यास आजार बरा होतो अशी माहिती डॉ. ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले.
येत्या 2030 सालापर्यंत भारताचा जागतीक स्तरावर या आजाराचे रूग्ण आढळून येणार असल्याची माहिती आयबीडी ट्रान्स फोर्डच्या संशोधनाच्या अहवालात नमूद केले आहे. या आजाराच्या जागृतीसाठी शोभा हॉस्पिटल अँड सुपर स्पेशालिटी गॅस्ट्रोएन्टरोलॉजी सेंटरतर्फे आयडीबी रुग्णांसाठी जनजागृती करण्यासाठी आज मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात जर्मनीवरून प्रा.डॉ. क्रिस जर्जेस यांनी लाईव्ह मार्गदर्शन केले. सोबत रुग्णांच्या मानसिक व शारिरीक स्वारथासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मयुर मुठे, आहार तज्ज्ञ मृदूला कुळकर्णी आणि योग अभ्यासक शंतनू खांबेटे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
जळगांवातील सुप्रसिध्द गॅस्ट्रोएन्टरोलॉजीस्ट व लिव्हर तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश चौधरी यांनी या कार्यक्रमात रुग्णांना मार्गदर्शन केले. या आजाराच्या लवकर निदानासाठी व उपचारासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या पध्दतींची माहिती यावेळी रुग्णांना देण्यात आली. उदा. अॅडव्हॉन्स ईमेजिंग गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोरकोपी, एन्टेरोस्कोपी, कॅप्सुल एन्डोस्कोपी या बद्दल माहिती दिली. या उपक्रमामुळे आयडीबीच्या रुग्णांना आपल्या आहारात आणि जीवन शैलीत बदल करुन आजारावर कशी मात करावी, याची निश्चित कल्पना रुग्णांना देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. योगेश चौधरी डॉ. मेघा चौधरी, डॉ. स्नेहा चौधरी, योगेश पाटील, भुषण चौधरी, अभिजीत चौधरी व शोभा हॉस्पिटल कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.