जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीची महाराष्ट्र शासनाकडून पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार कार्याध्यक्ष म्हणून माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांची निवड करण्यात आलीय. या समितीमध्ये ३४ सदस्य असून त्यात जळगावच्या दोघांचा समावेश आहे. शनिवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी शासनाने माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांची निवड केली होती. शासनाने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. दरम्यान सिंधी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शनिवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. अकादमीमध्ये शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभाग प्रधान सचिव हे सदस्य तर महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सहसंचालक हे सदस्य सचिव आहेत. समितीचे कार्याध्यक्ष म्हणून माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांची निवड करण्यात आली असून ३४ अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. अशासकीय सदस्य म्हणून जळगावचे डॉ.मूलचंद उदासी व रितू रायसिंघानी यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची पुनर्रचना केल्याने संपूर्ण सिंधी समाजाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे आभार मानले आहेत.