Home Cities जळगाव डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात महर्षी चरक यांना अभिवादन

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात महर्षी चरक यांना अभिवादन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संहिता, सिद्धांत आणि संस्कृत विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राचीन भारतातील महान वैद्य महर्षी चरक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी महर्षी चरकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना, अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी महर्षी चरक यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. आयुर्वेद शास्त्रातील त्यांचे मौल्यवान योगदान आणि ‘चरक संहिता’ या ग्रंथातील गूढ ज्ञानाचे महत्त्व त्यांनी विशद केले. हे प्राचीन ज्ञान आधुनिक वैद्यकशास्त्रात कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. उल्हास पाटील यांनीही ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्यांनी महर्षी चरक यांच्या कार्याचा गौरव करताना, विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्वेद परंपरेचा गौरव वाढवण्याचे आणि तिचे जतन करण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound