सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सावदा येथे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती फाल्गुन कृष्ण तृतीया तिथीनुसार साजरी करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाजन यांनी शिवचरीत्राची माहिती उपस्थीतांना दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.