भुसावळ मधून काँग्रेस कडून डॉ. राजेश मानवतकर यांना उमेदवारी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भुसावळ विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राजेश मानवतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील इतर जागांवर पक्षांची उमेदवार जाहीर झाले असले तरी महाविकास आघाडीच्या वतीने भुसावळ विधानसभा मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत साशंकता होती. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अगोदरच विद्यमान आमदार संजय सावकारे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात कोण असेल याबाबत मोठे उत्सुकता लागून होती. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाने डॉक्टर राजेश मानवतकर यांना रिंगणात उतारले आहे.

काँग्रेस पक्षाने आज 23 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात भुसावळ विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर मानवतकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. याआधी गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर मानवतकर यांच्या सौभाग्यवती डॉक्टर मधु मानवतकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना अपयश आले होते. यानंतर आता स्वतः डॉक्टर मानवतकर हे रिंगणात उतरणार असून त्यांचा सामना विद्यमान आमदार संजय सावकारे आणि वंचितचे उमेदवार जगन भाई सोनवणे यांच्याशी होणार आहे. म्हणजेच भुसावळ मतदार संघातून आता तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

Protected Content