पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कजगाव नाका म्हटलं तर मुख्य भाग आहे. या भागामध्ये पारोळा तालुक्याला लागून १३२ हून अधिक वर खेडे आहेत. परंतु या भागामध्ये पाण्याची कोणत्याच ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला मंडपामध्ये पाणपोई डॉ संभाजी राजे फाउंडेशन कडून उभारण्यात आलेले आहे.
डॉ.संभाजीराजे पाटील हे आरोग्यसेवेसह आपल्या डॉ संभाजीराजे पाटील फाऊंडेशनचा माध्यमातून अनेक समाजहित उपक्रम राबवून नागरीकांना सेवा देत आहेत. त्यांचा निस्वार्थ सेवेने गरजूंना या मोफत जलसेवेचा लाभ मिळत असून डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशनचे कार्य हे जोपासण्यासारखे आहे असे गौरद्गगार मोठे श्रीराम मंदिराचे ट्रस्टी गोपाल अग्रवाल यांनी काढले. डॉ.संभाजीराजे पाटील फाउंडेशन तर्फे शहरातील कजगाव नाका परिसरात नागरिकांसाठी मोफत जलसेवा सुरू करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या काही वर्षापासून डॉ संभाजीराजे पाटील फाउंडेशन हे अनेक समाजहित उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी,परोपकारी भावना जोपासत आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळें कजगाव नाका परिसरात डॉ संभाजीराजे पाटील यांनी मोफत जलसेवा देऊन ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची तहान भागवत आहे.
दरम्यान जलसेवा ही महामार्गालगत मुख्य रहदारीच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याने दररोज शेकडो नागरिकांना या जलसेवेचा लाभ होत व होणार आहे.दरम्यान वणी गडावर पायी जाणाऱ्या शेकडो भक्तांना ह्या मोफत जलसेवेचा मनसोक्त लाभ झाल्याने काही भक्तांनी बोलूनही दाखविले. दररोज दिवसातून ४५ ते ५० थंड ॲक्वा च्या पाण्याचे जार लागत असुन उन्हाळा समाप्त होईपर्यंत ही मोफत जलसेवा सुरू ठेवणार असल्याचे डॉ संभाजीराजे पाटील यांनी सांगितले.