वीजप्रश्नासाठी डॉ. संभाजीराजे पाटील आक्रमक; निवेदनाद्वारे राष्ट्रवादीने दिला आंदोलनांचा इशारा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरात गेल्या अनेक काळापासून सुरु असलेला वारंवार विजेचा लपंडाव याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पारोळा शहर यापूर्वीच अनेक समस्यांना तोंड देत असून यात महावितरण मोठी भर घालत असल्याने नागरिकांचे जीवन हैराण झाल्याचे दिसते.

पारोळा शहरात वारंवार खंडित होण्याची समस्या ही कायमची आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या समस्या वाढतच आहे. दिवस आणि रात्र याचे कोणतेही वेळ न बघता कोणत्याही पूर्वसूचनाविना, 5 ते 10 मिनिटांचे दिवसातून आठ ते नऊ वेळा, आणि बऱ्याचदा तासाभराचे सुद्धा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. 47 ℃ पर्यंतचा तापमानात शहरवासीयांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येने शहरातील नागरीक हे प्रचंड त्रस्त असून व्यापारी, उद्योग, शासकीय कामकाज, विद्यार्थी, पाणी पुरवठा, सलून कामगार, रसवंती कोल्ड्रिंक, त्याचबरोबर वैद्यकीय सेवा देखील विस्कळीत होत असून याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. वीज ही अत्यावश्यक सेवा असून या समस्यांनी जनसामान्यांना जगणे मुश्किल झाल्याचे दिसते.

हा वारंवार होणार खंडित पुरवठा बंद करण्यात यावा. यावर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. सदर समस्या यावर विशेष लक्ष देऊन सोडविण्यात यावी, तरी सामान्य पारोळा वासीयांना होणाऱ्या असुविधा निवारणासाठी विशेष लक्ष द्यावे, जनसामान्यांच्या उद्रेकाला आणि रोषाला सामोरे जावे टाळावे यानंतर देखील अशीच समस्या कायम राहिल्यास संपुर्ण शहरवासीयांना सोबत घेऊन आंदोलन पुकारण्यात येईल, या आंदोलन आणि परिणामांना महावितरण सम्पूर्णतः जबाबदार असेल. असा इशारा राष्ट्रवादीचे नेते डॉ संभाजीराजे पाटील यांच्याकडून देण्यात आला. अभियंता गौतम मोरे यांच्याकडून निवेदन स्वीयकारले गेले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ महेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या समस्या जनता विविध माध्यमातून ओरडून ओरडून सांगत असताना जनतेचे, व्यापारी, उद्योग, महिला व बाल यांचे अतोनात हाल होत असताना या जनआक्रोशाकडे जबाबदार लोकप्रतिनिधी कडून कानाडोळा केला जातोय हे या गावाचं दुर्दैव्य म्हणावं लागेल. यामुळे आता त्यांच्याकडून अपेक्षा संपल्यात असे यावेळी डॉ संभाजीराजे यांनी सांगितले

Protected Content