पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनची बैठक नुकतीच भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स येथे जेष्ठ डॉ. अनिल झंवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गजानन हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ प्रतिष्ठित डॉ. दिनेश सोनार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सदर बैठकीत चेअरमनपदी नेत्ररोग तज्ञ डॉ. सुनील पाटील, उपाध्यक्षपदी डॉ.अतुल पाटील, सचिवपदी नंदकिशोर पिंगळे, खजिनदारपदी डॉ. जिवन पाटील यांची निवड करण्यात आली.
पाचोरा डॉक्टर असोसिएशन वैद्यकीय क्षेत्रातील नावलौकीक असलेली जनहित जोपासणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून विविध समाजप्रबोधन व जनसेवेचे कार्य अविरत सुरू आहे. संघटना समाजसेवेचे व्रत घेऊन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या शिवाय संघटनेच्या वतीने विविध आजारांवर उपचारासाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे, शिबिरात मोफत चिकित्सा करून औषधी पुरविणे, आपात कालीन परिस्थितीत गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणे, मागील काळात जीवघेण्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले होते. या भिषण संकटात पाचोरा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व डॉक्टर यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांना मोफत औषधी व रुग्ण सेवा देण्याचे कर्तव्य बजावून प्रशासना सोबत खांद्याला खांद्या लावून सहकार्य केले.
मागील पूरपरिस्थितीत नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना लाईफ जॅकेट चे वाटप केले. गेल्या काही महिन्यांपासून परिवहन मंडळांच्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हितार्थ मागण्यांसाठी संप केल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यावेळी डॉक्टर असोसिएशनने संपकरी कर्मचाऱ्यांना भरीव आर्थिक मदतीचा हात दिला. सोबत संघटना जनतेचे आरोग्य सुदृढ व निरोगी असावे म्हणून आरोग्यासाठी आवश्यक असलेले क्रीडा व सामाजिक उपक्रम उत्साहात राबवत असते. संघटनेने माझ्यावर अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी मी डॉक्टर असोसिएशनचे जेष्ठ, अनुभवी आजी – माजी पदाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी डॉक्टर्स यांच्या मदतीने या संघटनेची गौरवशाली परंपरा अखंडित ठेवून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प नवनियुक्त अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार यांनी यावेळी केला आहे. डॉ. दिनेश सोनार सह नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे निवडीबद्दल वैद्यकीय, सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक, राजकीय वर्तुळातून अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. नरेश गावंदे, डॉ. भरत पाटील, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. अनंत जैन, डॉ. जाकीर देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. अमित साळुंखे, डॉ. राहुल काटकर, डॉ. विजय जाधव, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. पावन पाटील, डॉ. आलम देशमुख, डॉ. कुणाल पाटील, डॉ. संजय जाधव, डॉ. हर्षल देव, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. दिपक चौधरी, डॉ. राहुल पाटील, डॉ.अल्ताफ खान, डॉ. प्रविण माळी, डॉ. विशाल पाटील, डॉ. इंगळे, डॉ. प्रशांत सांगळे आदी उपस्थित होते.