Home Cities धरणगाव धरणगाव येथे शुक्रवारी डॉ.टी.डी. कुडे चौकाचे नामकरण

धरणगाव येथे शुक्रवारी डॉ.टी.डी. कुडे चौकाचे नामकरण



धरणगाव (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, अर्बन बँकेचे माजी चेअरमन तसेच भाजपाचे माजी नगरसेवक तसेच लाड शाखीय वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या ४० वर्षांपासुन समर्थपणे सांभाळणारे, प्रसिद्ध डॉ.दादासाहेब टी. डी .कुडे यांचे स्मरणार्थ गावतील बालकवी ठोंबरे शाळा व बी.एस.एन.एल.कार्यालया जवळील चौकास दादासो. डॉ. टी.डी.कुडे चौक असे नामकरण करण्यास मंजुरी मिळाली आहे. उद्या (दि.१५) शुक्रवार रोजी सायंकाळी ५.०० वाजता हा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नामकरण केले जाणार आहे. यावेळी खासदार ए.टी.पाटील, रा.स्व.संघाचे अ.भा.धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलिम पटेल तसेच सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडे परिवाराने केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound