धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) येथील लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ.बी.आर. आंबेडकर मोफत अभ्यासिका येथे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी नुकतीच भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की, मोफत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी चांगल्या दर्जाची अभ्यासिका उभारली आहे. याचा तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यावेळी अभ्यासिकाचे संचालक प्रशांत सोनवणे यांनी डॉ.बारेला यांना पुस्तक देऊन सत्कार केला. यावेळी समाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे, राजेंद्र पाटील,हितेंद्र पाटील,सुनिल कोळी,आरिफ तडवी,संदिप चौधरी ,विशाल सोनवणे,जितेंद्र भोई,अजय निंबाळकर आदी उपस्थित होते.