डॉ. गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीर

0
18

शेंदूर्णी प्रतिनिधी । पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ. सागर गरुड यांचा आज वाढदिवसनिमित्ताने मित्रपरिवारातर्फे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले. 

या शिबिरात पहुर,लोहारा, मेणगाव, सोयगाव, वरखेडी,पाचोरा, शेंदूर्णी, कुर्हाड,नेरी परिसरातील तब्बल १२५ युवकांनी रक्तदान केले,या वेळी डॉ.सागर गरुड यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ .सागर गरुड यांनी आपत्तीच्या काळात एकमेकांना सहकार्य करणे व मदत करणे मानवता धर्म आहे म्हणून कोरोना ग्रस्त रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य मी करीन असे सांगितले.