मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील यांची मुंबई येथील के. एम. हॉस्पिटलमध्ये सेवांतर्गत पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी लघू वेतन संघटनेच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
या सत्कार समारंभात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. पाटील यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांनी दिलेल्या सेवेमुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या समर्पित सेवेमुळे समाजात सकारात्मक बदल घडल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. भूषण पाटील यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी संघटनेचे आभार मानत, पुढील शिक्षणाद्वारे अधिक ज्ञान संपादन करून समाजसेवेच्या कार्यात अधिक प्रभावीपणे योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे, सहायक अधिसेविका आशा चिखलकर, सहायक अधीक्षक पी. पी. चौधरी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप काळे, ज्येष्ठ सल्लागार अनिल सुरवाडे, जिल्हा सदस्य रोहन भोई, कृष्णाल पाटील, विशाल इंगळे, संकेत कुंभारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



