सावदा–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा सावदा शहरात विशेष उत्साहात आणि भव्य दिव्य पद्धतीने साजरी होणार असून, यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती – 2025” ची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या समितीत शहरातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने जयंती उत्सवाला विशेष रंगत येणार आहे. या वर्षी जयंतीनिमित्त आकर्षक वाजंत्री, सामाजिक संदेश देणारे देखावे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे.
समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे :
अध्यक्षपदी सिद्धांत संन्यास यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून निखिल लोखंडे आणि राज भालेराव, सचिव प्रकाश तायडे, सहसचिव मनोज भालेराव, खजिनदार विवेक डोळे, कोषाध्यक्ष रोनित तायडे आणि सल्लागारपदी लखन सोनवणे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून पवन लोखंडे, रोहित संन्यास, सिद्धांत लोखंडे, सारंग तायडे आणि दीपक तायडे हे कार्यरत असणार आहेत. समितीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा संदेश समाजात पोहोचवावा. या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.