एरंडोल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

WhatsApp Image 2019 04 14 at 8.05.26 PM

एरंडोल (प्रतिनिधी)  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ व्या जयंतीनिमित्त बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण  करून अभिवादन करण्यात आले. तसेच सकाळी  मोटर सायकल रॅली काढण्यात आली. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.

 

सकाळी नऊ वाजता झालेला माल्यार्पण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलीस निरीक्षक अरुण हजारे, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील, कुणाल महाजन, डॉ. सुरेश पाटील, डीडीएसपी महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य ए. आर. पाटील, नगरसेविका छाया दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,  जगदीश ठाकुर,  तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन, शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष प्रमोद महाजन, माजी उपनगरात माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड, सेवा निवृत्त मुख्याध्यापिका उषा खैरनार, भीमराव खैरनार, डॉ. अतुल सोनवणे, संघरत्न गायकवाड, प्रा. सुधीर शिरसाठ यांच्यासह पंचशील मंडळाचे कार्यकर्ते तसेच विविध शैक्षणिक सामाजिक व राजकीय शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.  माल्यार्पण कार्यक्रमानंतर शहरातून मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सवाद्य शहराच्या मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Add Comment

Protected Content