जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ. अविनाश आचार्य पूर्व प्राथमिक विभागाच्या बालवाटीक गटातील विध्यार्थ्यांचे श्रवण विकास मंदिर, सावखेडा येथे एक दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानार्जनासह मनोरंजनाद्वारे विद्यार्थ्यांनी धम्माल केली.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी डॉ. अविनाश आचार्य पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे एकदिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी श्रवण विकास मंदिर, सावखेडा येथे भेट दिली. त्यानंतर मैदानी खेळ खेळत रस्सीखेचचा आनंद लुटला. घोडेस्वारी करत रपेट मारली. परिसरात शेतीबाबत माहिती जाणून घेतली. सायंकाळी श्री. आमोदकर यांनी जोकरची वेषभूषा साकारून मनोरंजन केले. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर शेकोटी पेटविण्यात आली. यावेळी वेगवेगळी गाणी सादर करत विद्यार्थ्यांनी धम्माल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिबिराचा समारोप झाला. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या.