यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. त्या काळातील बहिष्कृत (अस्पृश्य) मानल्या जाणाऱ्या जाती समाजात त्यांचे जन्म वाळवा जिल्हा सांगली येथे १ ऑगस्ट रोजी १९२० रोजी झाला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षणाचा प्रवास देखील कष्टप्रद होता. तरी ही त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी अनेक अडचणीवर मात केली व त्यांच्या वाचनाच्या व आत्मशिक्षणाच्या प्रवासाने मोठे लेखक बनविले, त्यांचे लेखन आणी सामाजिक आणि राजकीयदृष्टया कृतीशिलतेवर आधारीत होते. अशा संघर्षमय जिवन जगणाऱ्या थोर समाजसेवकांच्या विचारास आजच्या तरूणांनी आत्मसात करणे गरजे असल्याची माहीती यावल येथील युवा समाजसेवक व आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
यावल येथे साहित्यरत्न लोकशाहीर थोर समाजसेवक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने यावल येथे १ ऑगस्ट रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थित यावलच्या जुन्या तहसील कार्यालया पासुन थोर समाजसेवक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संपुर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद रंणसिगे, उपाध्यक्ष प्रेम मोरे , सचिव सुनिल बिऱ्हाडे , खजिनदार दिलीप सावळे, सहसचिव रितेश सावळे यांच्यासह समिती सदस्य किरण बिऱ्हाडे, धनराज मोरे , रितिक अनसलगोल व भरत मोरे यांनी महत्वाचे परिश्रम घेतले .