Home राज्य विक्री कर निरीक्षकपदी डॉ. जयश्री डांगे यांची नियुक्ती

विक्री कर निरीक्षकपदी डॉ. जयश्री डांगे यांची नियुक्ती

0
52

jayashri dange

सावदा प्रतिनिधी । येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मंगला डांगे यांच्या सुविद्य कन्या डॉ. जयश्री डांगे (बी.ए.एम.एस) या महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या (एम.पी.एस.सी.) विक्री कर निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेतून राज्यातून एस.सी. मुलींमधून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्यांना त्यांच्या आईचे व त्यांचे पती प्रा. कमलेश आत्माराम नेरकर (एम.एस.सी.पी.एच.डी. एस.पी.महाविद्यालय.पुणे) भाऊ राहुल डांगे यांचे सहकार्य लाभले. त्यांचे सावदा न.पा.अध्यक्ष अनिता येवले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, गट शिक्षणाधिकारी अजीत तडवी रावेर, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीसह सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound