मुंबई प्रतिनिधी । माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून विख्यात विचारवंत आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांना आज पुणे पोलिसांनी मुंबई अटक केली. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना कनिष्ठ कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तेलतुंबडे यांनी पुणे कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र पुणे कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या अनुषंगाने आज पहाटे पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून तेलतुंबडे यांना ताब्यात घेतले. त्यांची विलेपार्ले पोलीस स्थानकात चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.