
धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेतर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, उपनगराध्यक्ष अंजलीताई विसावे, मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी भा.ज.पा.चे नेते सुभाष अण्णा पाटील,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भा.ज.पा.चे शिरीष अप्पा बयस,गटनेते कैलास माळी, संजय पाटील,शरद पाटील,भा.ज.पा.सेना युतीचे नगरसेवक पदाधिकारी न.पा.कर्मचारी उपस्थीत होते.