जळगाव (प्रतिनिधी ) खान्देश माळी महासंघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ह्यावेळी पक्षी बचाव अभियान राबविण्यात आले व ५० परळ मातीची भांड्यांचे वाटप करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान करा, जीव वाचवा स्त्रीभ्रूणहत्या थांबवा आदी पोस्टर ह्या निमित्ताने वाटप करण्यात आले.
अनोख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यांचा मानस वसंत पाटील यांनी व्यक्त केल्स. यावेळी गजानन महाजन, अनिल अडकमोल, शुभांगी बिऱ्हाडे, निवेदिता ताठे, प्रकाश पाटील, विक्की माळी, कृष्णा माळी, दिलीप माळी आदी उपस्थित होते. सध्याची परिस्थिती दुष्काळी असल्याने पर्यावरण संरक्षण हा सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही अश्याच प्रकारे उपक्रम घेऊन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्यने समाज बांधव उपस्थित असतात. अशा ठिकाणी जर पर्यावरणबचावाबाबत जनजागृती होऊन थोर पुरुषांना देखील हेच अपेक्षित असते. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन सरचिटणीस वसंत पाटील यांनी सांगितले.