श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. पाठोपाठ त्यांनी गंदेरबल विधानसभा निवडणूकही जिंकली आहे. अब्दुल्ला यांनी तब्बल १०,५७४ मतांच्या फरकाने गंदेरबलवर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा फडकवला आहे.
इडिया आघाडीने राज्यात बहुमत मिळवले आहे. त्यामुळे राज्यात आता नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस मिळून आघाडीचं सरकार स्थापन करणार आहे. अशातच, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेत ते जाहीर केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, आपल्या इंडिया आघाडीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे लवकरच ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.