जामनेर प्रतिनिधी | देशामध्ये १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीचा डोस सुरु करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील विविध शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील ३२४ विद्यार्थ्यांना कोव्हाक्सिन कोरोना लसीचा डोस देण्यात आला.
जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये ‘उपजिल्हा रुग्णालय जामनेर’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३२४ विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून या लसीकरणासाठी डॉ.स्वाती विसपुते, औषध निर्माता सुनिता दवंगे, हर्षा गवळी, सागर चौधरी, निखिल भालेराव आदींनी काम केले.
डॉ.स्वाती विसपुते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना लस संदर्भात माहिती दिली. लस घेतल्यानंतर त्रास झाला तर काय खबरदारी घ्यावी या संदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.