Home राजकीय दु:खद घटनेवरून राजकारण नको : मुख्यमंत्री फडणवीस

दु:खद घटनेवरून राजकारण नको : मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील एका वरिष्ठ नेत्याच्या दु:खद निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा संवेदनशील प्रसंगातही काहीजण स्वतःचे राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित नेते हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात आहे. मात्र, या दु:खद घटनेनंतर काही घटकांकडून आरोप-प्रत्यारोप आणि तर्कवितर्क सुरू असल्याचे दिसत असून हे अत्यंत चुकीचे आहे.

“प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे. हा शोक व्यक्त करण्याचा आणि संयम राखण्याचा काळ आहे,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून आवश्यक चौकशी सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या काळात अफवा पसरवू नयेत आणि कुटुंबीयांच्या भावना जपाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


Protected Content

Play sound