यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा गाव ते फाटयापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता धोकादायक झाला असून देखील लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
या बाबत चे वृत्त असे की, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावाला जोडणारा डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा या चार किलो मिटर लांबीच्या मार्गाची मागील दोन वर्षा पासून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डा आहे की, खड्डयात ररस्ता हे समजणे अवघड आहे. या मार्गावर ठीक-ठीकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे फारच जिकरीचे झाले असुन या मार्गाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागेल का? हाच प्रश्न सर्वाना पडलाय. या मार्गाने शेतीकामासाठी जाणारी मजूर, मंडळी केळी बागायतीची तोड साखर कारखान्याला दिले जाणारी उसतोड मजूर, डोंगरदे येथील देवस्थान दर्शनासाठी भाविक, वावरणे डोंगर कठोरा येथील मुलींची महाविद्यालयामुळे नियमीत या मार्गाने वर्दळ असते. या सर्व बाबींमुळे मार्गाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक लागल्यावर लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळी मते मागण्यासाठी देखील याच मार्गाने जात असते. मग त्यांना या रस्त्याची झालेली दुरावस्था का दिसत नाही? असा प्रश्न नागरीकांकडून विचारला जातोय.