यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत रेशन धान्य हे गेल्या दोन महिन्यांपासून यावल शहरात वितरण करण्यात आलेले नाही. तरी प्रशासनाने तातडीने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील धान्य तातडीने वितरीत करावे, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावल तहसीलदार महेश पवार यांना दिले.
याबाबत माहिती अशी की, यावल शहरात प्राधान्य कुटुंब, अन्नसुरक्षा अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मिळत असलेले मोफत धान्य हे जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यापासून मिळाले नाही. हातावर पोट असलेल्या गोर,गरिबांना यामुळे खूपच हालाकीचा सामना करावा लागत आहे व महाग धान्य खरेदी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. तेव्हा या दोन महिन्यातील धान्य तात्काळ गोरगरिबांना मिळावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तात्काळ धान्य न मिळाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, समन्वयक किशोर माळी, भूषण खैरे, मयुर शिर्के, मुनाफ पटेल, किरण भोई, अरुण सावकारे, भरत भोई, ऋषिकेश कोळी, सागर भिल, हेमंत फेगडे, धनराज फालक, सागर लोहार, शाहरुख तडवी, भूषण फेगडे, भूषण नेमाडे, मोहसिन खान सह आदींनी दिले आहे