सावदा ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या सावदा -पिंपरूड रस्त्यावर दोन कारची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ४८ वर्षीय महिला जागीच ठार झाली तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
भावना भर सुपे (वय-४८) रा. वाघोदा ता. रावेर असे मयत महिलेचे नाव आहे. त्या माजी उपसभापती भरत सुपे यांच्या पत्नी होत.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळ असलेल्या मोठा वाघोदा येथील रहिवासी व माजी उपसभापती भरतशेठ वसंतराव सुपे यांचा मोठा मुलगा अक्षयचे लग्न झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी रिशेप्शन ठरले होते. सावदा येथे रीसेप्शन असल्याने खरेदीनिमित्त कुटुंबातील सदस्य आज गुरुवारी सकाळी कार ( डीएल १० ए. ६१६५) ने जळगाव येथे येत असतांना सावदा -पिंपरूळ दरम्यान समोरून येणारी इंडिका कार (एमएच १९ पी २६१२) यांच्यात यांच्या भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात भावना भरत सुपे (४०, रा.वाघोदा) यांचा जागीच मृत्यू झाला तर विद्या काशिनाथ सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे दोघे रा. मोठे वाघोदा ता. रावेर यांच्यासह इंडिका वाहनातील प्रवासी व रावेर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परीवारातील रेखा हेमंत नाईक (वय-४०), प्रतीक हेमंत नाईक (वय-२०), प्रीती हेमंत नाईक (18, रा.रावेर) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सावदा येथे लग्नानिमित्त ५ डिसेंबर रोजी रीसेप्शनचा कार्यक्रम असल्याने समारंभाची जोरदार तयारी सुरू होती काळाने अपघातरूपी झडप घातल्याने वाघोद्यातील सुपे परीवारावर शोककळा पसरली.