यावल येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

jakhamin

यावल (प्रातिनिधी) येथील आयशानगर परिसरात रमजान ईदच्या बडी रातच्या वर्गणी (चंदा) मागण्यास गेल्याच्या कारणावरुन वाद होवुन दोन गटात शाब्दीक चकमक होवुन झालेल्या मारहाणीत तिन जण जखमी झाल्याची घटना घडली असुन पोलीसात दोन्ही गटाकडुन फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असुन, या प्रकरणातील ३ जणांना पोलीसांना अटक केली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील आयशा नगर येथे राहणारा अशपाक शाह गफ्फार शाह हा आपल्या घरा जवळच राहणारे सैय्यद ईब्राहीम सैय्यद ईस्माईल यांच्याकडे घरी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रमजान निमित्त बडी रातचा चंदा ( वर्गणी) मागण्यासाठी गेला असता वारंवार वर्गणी मागण्यास का येतो असे विचारल्या वरून झालेल्या शाब्दीक चकमकी वरुन वाद वाढल्याने भानगडीचे रुपांतर प्रचंड हाणामारीत झाले.

या हाणामारीत सैय्यद ईब्राहीम सैय्यद ईस्माईल, शेख शरीफ शेख निजाम, सैय्यद ईकबाल सैय्यद निजाम यांनी संगनमताने मिळुन अशपाक शाह गफ्फार शाह यास लोखंडी आसारी, काठयांनी दगड विटानी जबर मारहाण केली यात मध्यस्यथी करण्यास गेलेल्या अशपाक शाहच्या आई शमीम बानो गफ्फार शाह या देखील या मारहाणीत जखमी झाले. या अशपाक शाह यास मारहाणीत डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यास तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी प्रथमपचार केले. मात्र अशपाक शाह हिची प्रकृती गंभीर असल्याने त्यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्या गटा कडुन फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु असुन, गफ्फार शाह मुसा शाह यांनी फिर्याद दिल्याने भाग ५ भा.द.वी. कलम३२४, ३२३, ४५२, ३०६, ३४, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

Add Comment

Protected Content