Home धर्म-समाज कळमसरा विकास सोसायटी वर शेतकरी पॅनलचे वर्चस्व

कळमसरा विकास सोसायटी वर शेतकरी पॅनलचे वर्चस्व

0
52

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरा येथील विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत ‘शेतकरी पॅनल’चे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले असून ‘परिवर्तन पॅनल’ला भोपळाही फोडता आला नाही.

कळमसरा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. २२ मे रोजी पार पडली. यात भाजप पुरस्कृत ‘शेतकरी पॅनल’ला संपूर्ण १३ जागांवर विजय मिळविला. तर विद्यमान सरपंच अशोक चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या ‘परिवर्तन पॅनल’ला एकही जागा मिळाली नाही.

शेतकरी पॅनेलचे सर्व साधारण जागेवर विजयी उमेदवार –

शालिक श्रीपत पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, विक्रम भिका पाटील, आदेश पंडित वाघ, श्रावण दौलत तेली, आत्‍माराम नारायण उशीर, बाबुलाल शेनपडु माळी, प्रवीण प्रकाश डांबरे

इतर मागासवर्गीय – गुणवंत सुभाष चौधरी

महिला राखीव – सुशिलाबाई अशोक चौधरी, निर्मला महारु पाटील

अनुसूचित जाती जमाती – विनोद देवचंद निकम

विमुक्त जाती – दिगंबर जंगलु हटकर

निवडणूक अधिकारी म्हणून बी. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे आमदार गिरीश महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. शेतकरी पॅनलच्या विजयासाठी ईश्‍वर पाटील, दत्तात्रय चौधरी, श्याम पाटील, समाधान पाटील, रतन बाविस्कर, बापू सावकार, संजय गयान, शेखर चौधरी, संजय उशीर, फकीरा पाटील, गजानन चौधरी, बापू मनोरे, युवराज चौधरी, जगन धनगर, गोपाळ डांबरे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound