घरगुती गॅसचा काळाबाजार, चौघांना अटक; एलसीबीची कारवाई !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील वखाराजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनांमध्ये भरणाऱ्या एका तरुणावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कारवाई केली आहे. या कारवाईत ५ गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे इतर साहित्य असा ७४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा वखारजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता चार ठिकाणी छापा टाकला. यात कारवाईत संशयित आरोपी वसीम चंगा शहा वय-२७, अखलाख खान जहांगिर खान वय २९, फिरोज अलाउद्दीन शेख वय -२२ आणि जुबेरखान उस्मानखान पठाण वय-३२, सर्व रा. पिंप्राळा जळगाव या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून त्याच्याजवळ असलेले घरगुती गॅसचे ११ सिलेंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण २ लाख १ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करीत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा वखारजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी वसीम चंगा शहा वय-२७, रा. वखारजवळ, पिंप्राळा, जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेले घरगुती गॅसचे ५ सिलेंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ७४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक प्रवीण भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी वसीम चंगा शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करीत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या सुचनेनुसार आणि एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, पोलीस चालक भरत पाटील यांच्यासह रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, इरफान मलिक अशांनी केली आहे.

Protected Content