यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व डॉक्टर्स मंडळींची बैठक जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या निर्देशान्वये १६ जुलै रोजी दुपारी तीन वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे.
कोवीड१९ संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली असून, शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहावे असे आवाहन यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. या मध्ये खाजगी डॉक्टर्स मंडळींनी कोरोना आजाराच्या संदर्भात खबरदारी म्हणुन घ्यावयाची उपाययोजना व इतर सर्वसामान्य नागरीकांच्या आजारा बाबतीत रुग्णांना द्यावयाची सेवा या संदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत होणार असल्याचे समजते.
यावल शहरातील अनेक खाजगी व्यवसायीक डॉक्टर्स यांचे दवाखाने बंद असल्याची शहरातील नागरीकांची ओरड असुन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तहसील कार्यालयात मागील आठवड्यात एक वैद्यकीय व्यवसायीक डॉक्टर्स यांची बैठक घेण्यात आल्यानंतर देखील फारसा बद्दल झाल्याचे दिसुन येत असल्याचे चित्र पहावयास येत आहे. यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news