Home Cities जळगाव सूर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. सुरेश सावंत

सूर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. सुरेश सावंत


 

6136ef65 ae6b 44c0 be85 ff17632d4660

 

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या १६ वर्धापन दिन तथा सतीश जैन यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याला २९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मंडळातर्फे यंदा चार साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. यात नोव्हेंबरमध्ये बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. सूर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांची निवड करण्यात आली आहे.

सावंत यांच्या नावावर आजमितीस ३५ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यात काव्य संग्रह, बालगीत संग्रह, चरित्रात्मक लेख संग्रह, बालकथा संग्रह यांचा समावेश असून महाराष्ट्र राज्य शासनासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. शालेय व विद्यापीठात त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

मंडळातर्फे फेब्रुवारीत अष्टपैलू पद्मश्री डॉ. भवरलाल जैन एक दिवशीय मराठी साहित्य संमेलन, मार्चमध्ये नाशिक येथे जिल्हास्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येत्या ऑगस्टमध्ये श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित १५ राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound