उन्नाव (वृत्तसंस्था) मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिलेत तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन. त्यामुळे मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असे म्हणत साक्षी महाराजांनी एकप्रकारे मतदारांना धमकावले आहे.
उन्नावमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आता येत्या लोकसभा निवडणुकांणध्ये साक्षी महाराज पुन्हा एकदा खासदार होऊ इच्छितात. त्याचमुळे त्यांनी दारोदार हिंडून मतं मागण्यास सुरूवात केली आहे. तसेच मला निवडून दिले नाही तर मी तुम्हाला शाप देईन असाही इशाराही त्यांनी दिला आहे. तूर्तास मी तुमच्याकडे मतं मागतो आहे, तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरत आहे. मात्र तुम्ही मला नाकारलत तर मात्र मी तुम्हाला शाप देईन, तुमच्या आयुष्यात असलेला आनंद मी हिरावून घेईन असेही साक्षी महाराजांनी म्हटले आहे. साक्षी महाराज हे भाजपाचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत.